रोजगार निर्मिती व वाहतूक समस्या दूर करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करा - श्रीरंग बरगे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 January 2025

रोजगार निर्मिती व वाहतूक समस्या दूर करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करा - श्रीरंग बरगे


मुंबई - रोजगार निर्मिती व वाहतूक समस्या समूळ नष्ट करायच्या असतील तर ओला, उबेर, रॅपिडो सारख्या खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्यांना एकाच नियमावलीत आणण्याऐवजी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याची गरज असल्याचे मत महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे श्रीरंग बरगे यांनी व्यक्त केले आहे. आरटीओने घालून दिलेल्या नियमांचे या पुरवठादरांकडून कधीच पालन करण्यात आले नसल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे. तसेच नवे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा हा निर्णय सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी घातक ठरणारा आहे, अशी टीकाही बरगे यांनी केली. 

राज्यातील खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या पुरवठादारांना एकाच शासकीय नियमनात आणण्यासंदर्भात काल मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला वरिष्ठ शासकीय अधिकारी व प्रवासी वाहतुक पुरवठादार कंपनीचे प्रतिनिधी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. असाच प्रयोग जुलै २२ मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुद्धा झाला होता. त्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली होती. पण त्यावेळी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील सर्व कामगार संघटना व अभ्यासकांनी याला विरोध केला होता. आताही सर्व कर्मचारी संघटना व इतर संबंधित यांना एकत्र करून या सरकारच्या या संकल्पनेला विरोध केला जाईल असेही बरगे यांनी म्हटले आहे.

रोजगार निर्मिती व वाहतूक समस्या हे  उद्देश सफल होणार नाहीत -
परिवहन नियमाअंतर्गत सर्व खाजगी वाहतूकदाराना एकत्रित आणून  प्रवासी सुरक्षेला प्राधान्य देण्याचा सरकरचा उद्देश सफल होणार नसून  वाहतूक पुरवठादार कंपन्यांअतर्गत चारचाकी, बाईक, टॅक्सी यांचा समावेश केल्यास ते सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करीत नाहीत. हे यापूर्वीच सिद्ध झाले असून सर्वात जास्त अपघात हे खाजगी गाड्यांचे झालेले आहेत. हे आकडेवारीतून सिद्ध झाले आहे. त्याचप्रमाणे एसटी स्टँडच्या २०० मिटर आजू बाजूला अश्या प्रकारच्या गाड्याना बंदी असताना व टप्पे वाहतुकीस परवानगी नसतानाही त्याचे सर्रास उल्लंघन होत आहे. याउलट एसटीमध्ये चालक वाहक व यांत्रिकी पदावर अनेक महिला काम करीत असून एसटीच्या गाड्या वाढविल्यास त्यातूनही रोजगार निर्मिती व महिलांना रोजगार देण्याचा सरकारचा उद्देश सफल होईल असेही बरगे यांनी म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad