माणगाव तालुक्यातील पूर्वजात मालकी हक्काच्या ५०० एकर जमिनी परस्पर विक्री करण्याचे षडयंत्र - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 January 2025

माणगाव तालुक्यातील पूर्वजात मालकी हक्काच्या ५०० एकर जमिनी परस्पर विक्री करण्याचे षडयंत्र


रायगड - जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील जिते, बोरीवली, बोरमच, साखलेवाडी अशा चार गावातील पिढीजात मालकी हक्काची ५०० एकर जमीनी परस्पर विक्रीचा  कारस्थान, षडयंत्र रचले जात असून परस्पर जमिनी विक्रीचा कुटील डाव असफल करण्यात यावा, अशी मागणी करणारे निवेदन माणगाव तालुका प्रांत अधिकारी यांना देण्यात आले. यावेळी ग्रामस्थांची बाजू लक्ष्मण महाळुंगे यांनी मजबूत बाजू मांडली, कामगार नेते रमेश जाधव आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
      
माणगाव तालुक्यातील उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, उपविभागीय पोलिस अधिकारी यांची ही‌ भेट घेण्यात आली. तालुक्यातील जमिनी परस्पर विकल्या जावू नयेत, वाढवडीलांपासुन कबजेदार अशा शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची जागा मिळवण्यासाठी खबरदारी घ्यावी, अशी विनंती प्रशासकीय अधिकारी यांना करण्यात आल्याचे कामगार नेते रमेश जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. यावेळी संबंधित प्रशासकीय अधिकारी यांनी सर्व ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेवून योग्य मार्गदर्शन व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुका एमएमआरडीए अंतर्गत आला असून या‌ तालुक्यातील जमिनींना सोन्याचा भाव आला आहे.त्यामुळे या भागातील जमिनींना मागणी व गुंतवणूक वाढली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad