मुंबई - नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - २०२४ अंतर्गत मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यात बृहन्मुंबई महानगरपालिकेने उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. या कामगिरीवर आधारित ‘प्रवास अभिव्यक्तीचा, मागोवा निवडणुकीचा’ या कॉफी टेबल बुकचे महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या हस्ते महानगरपालिका मुख्यालयात आज (दिनांक २९ जानेवारी २०२५) प्रकाशन करण्यात आले.
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, विशेष कार्य अधिकारी (निवडणूक) विजय बालमवार यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर, माननीय केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे प्रथमच बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त यांच्यावर मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या दोन्ही जिल्ह्यांचे जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली होती. दोन्ही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेचे चारही अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त यांनी अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी या नात्याने धुरा सांभाळली. माननीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करत त्यामध्ये काही कल्पक उपक्रमांची भर घालून बृहन्मुंबई महानगरपालिकेने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ ची मतदान प्रक्रिया अधिक सुलभ व उत्साही केली. मतदान जनजागृतीसाठी वेगवेगळे उपक्रम राबवण्यासोबतच ‘आपले मतदान केंद्र जाणून घ्या’ या विशेष मोहीमेतून मतदान केंद्रांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवण्यात आली. ज्येष्ठ नागरिक, महिला, युवकांसोबतच तृतीयपंथी समुदायातील मतदारांचा सहभाग वाढविण्यासाठी विशेष अभियान राबविण्यात आले. मोठ्या गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदान केंद्रांची स्थापना करण्यात आली. मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करुन प्रत्येक मतदान केंद्रांवर निश्चित मतदारांसाठीच मतदानाची सोय करण्यात आली. प्रत्येक मतदान केंद्रांवर निश्चित किमान सुविधा जसे की, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, आसनव्यवस्था आदी पुरविण्यात आल्या. या सर्व बाबीचा इष्ट परिणाम दिसून आला आणि मतदानाची टक्केवारी वाढली.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक- २०२४ मध्ये विविध उपक्रम, अभियान तसेच कामकाजातून बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने निवडणूक आयोजनासंदर्भात एक आदर्श निर्माण केला. निवडणूक प्रक्रिया, पूर्वतयारी, नागरी सोयीसुविधांची पूर्तता, प्रत्यक्ष मतदान आदी संपूर्ण प्रक्रियेची सचित्र मांडणी कॉफी टेबल बुकच्या माध्यमातून करण्यात आली आहे. मराठीमध्ये ‘प्रवास अभिव्यक्तीचा, मागोवा निवडणुकीचा’ या नावाने तर इंग्रजीमध्ये ‘जर्नी ऑफ एक्सप्रेशन बियाँड द बॅलेट’ या नावाने हे कॉफी टेबल बुक प्रकाशित करण्यात आले आहे. कॉफी टेबल बुकची संकल्पना महानगरपालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांची आहे. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अश्विनी जोशी यांनी कॉफी टेबल बुकचे सादरीकरण तसेच निर्मितीविषयी मार्गदर्शन केले आहे. जनसंपर्क विभागाने या कॉफी टेबल बुकचे संपादन केले आहे.

No comments:
Post a Comment