मुंबई - सायन कोळीवाडा येथे स्थानिक आमदार तमिळ सेलवन यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते आणि भाजपा उपाध्यक्ष रवी राजा यांच्या हस्ते भाजपा सदस्य अभियानाला सुरुवात करण्यात आली. यावेळी स्थानिक नागरिकांनी भाजपा सदस्य नोंदणी अभियानाला चांगला प्रतिसाद दिला.
भाजपाचे सदस्य नोंदणी अभियान सुरू आहे. या पार्श्वभूमीवर 5 जानेवारी रोजी सायन कोळीवाडा येथे रवी राजा यांच्या कार्यालयाबाहेर नोंदणी अभियान सुरू करण्यात आले. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांसह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने भाजपाचे सदस्य झाले. आगामी पालिका निवडणूकीत सायन कोळीवाडा येथून काँग्रेसचा सुफडा साफ करण्याचा संकल्प रवी राजा यांनी यावेळी केला. यावेळी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment