मुंबईकर आणि पोलिसांच्या "या'' प्रश्नांवर आदित्य ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 January 2025

मुंबईकर आणि पोलिसांच्या "या'' प्रश्नांवर आदित्य ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

 


मुंबई - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नेते आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanavis) यांची भेट घेतली. यावेळी सर्व मुंबईकरांना (Mumbaikar) पाणी आणि पोलिसांच्या वसाहतीची (Police) कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी आदित्य ठाकरे यांनी केली. यावेळी आमदार सचिन अहिर, आमदार सुनिल शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. 

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना मागेल त्याला पाणी हे धोरण सुरू करण्यात आले होते. मुंबईत पाणी माफियांकडून पाण्याची विक्री केली जात असल्याने हे धोरण आणण्यात आले होते. या धोरणामुळे मुंबई महापालिकेला पाण्याचा थेट महसूल मिळत होता. मात्र राज्यात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होताच हे धोरण बंद करण्यात आले होते. मागेल त्याला पाणी हे धोरण पुन्हा सुरू करण्याची मागणी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. 

महाविकास आघाडी सरकारने नवीन पोलीस वसाहतींसाठी ६०० कोटी रुपयांची तरतूद केली होती. वरळी, माहीम, नायगाव, कुर्ला येथील वसाहतींची कामे मागील २ वर्षांपासून प्रलंबित आहेत. ती तातडीने सुरू करावीत. निवृत्त पोलीस कुटुंबांना पोलीस वसाहतीमध्ये राहण्यासाठी दंड आकाराला जातो. हा दंड स्थगित करावा किंवा कमी करण्यात यावा तसेच मुंबईत निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांसाठी कायमस्वरूपी घरे उपलब्ध करून द्यावीत अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली. कलेक्टरच्या जमिनी फ्रीहोल्ड करण्यासाठी प्रीमियम कमी करण्याच्या धोरणाची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी, अशी विनंतीही त्यांनी यावेळी केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad