राजापूर - सांगलीहून राजापूरच्या दिशेने येणाऱ्या बसला अणस्कुरा घाटात सोमवारी सकाळी १०.३० वाजता ब्रेक निकामी झाल्यामुळे अपघात झाला. मात्र यावेळी चालक एस. आर कुर्णे यांनी प्रसंगावधान राखत गाडी डोंगराच्या दिशेने घातल्याने मोठा अपघात टळला. त्यांच्या खबरदारीमुळे ५० प्रवाशांचा जीव वाचला. अन्यथा गाडी दरीत कोसळून मोठी जीवितहानी झाली असती. (50 passengers saved by ST driver)
कुर्णे हे आपल्या ताब्यातील बस क्र. एम. एच. १४, बी. टी. २९७५ ही बस राजापूर सांगली बस घेवून सांगली येथुन सकाळी ६.३० वाजता रवाना झाले होते. ही बस सकाळी १०.३० वाजण्याच्या दरम्यान अणस्कुरा घाट उतरत असताना अचानक गाडीचे ब्रेक निकामी झाले. चालक कुर्णे यांच्या निदर्शनास ही बाब येताच त्यांनी अत्यंत सावधगिरीने बस डोंगराच्या दिशेने वळवत थांबवली. त्यामुळे सुदैवाने मोठा अपघात टळला. या बसमध्ये जवळपास ५० प्रवासी होते. हे सर्व प्रवाशी सुखरूप आहेत. दरम्यान या गाडीने राजापूर पोलीस उपनिरीक्षक सुधीर उबाळे व पाचल तलाठी सतीश शिंदे हे देखील प्रवास करीत होते. त्यांनीही मोठया अपघातातून वाचल्याची प्रतिक्रिया दिली. चालक कुर्णे यांच्या प्रसंगावधानाचे कौतुक होत आहे.
No comments:
Post a Comment