नवी दिल्ली - केंद्र सरकारकडून जीएसटी कलेक्शनची आकडेवारी जाहीर करण्यात आली. डिसेंबरमध्येही जीएसटी कलेक्शन १.७७ लाख कोटींपेक्षा अधिक राहिले आहे. गतवर्षीच्या जीएसटी कलेक्शनच्या तुलनेत यंदा ७.३ टक्के वाढ झाली आहे. डिसेंबर २०२३ मध्ये हे जीएसटी कलेक्शन १.६५ लाख कोटी रुपये होते. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात कलेक्शन वाढले होते. डिसेंबर २०२४ मध्ये वस्तू आणि सेवा कराच्या वसुलीत वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
डिसेंबर महिन्यात जीएसटी कलेक्शन ७.३ टक्क्यांनी वाढून १.७७ लाख कोटी झाले. २०२३ मध्ये जीएसटी कलेक्शन १.६५ लाख कोटी रुपये होते. सलग दहाव्यांदा जीएसटी कलेक्शन १.७७ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक झाले. मात्र, एप्रिल २०२४ मध्ये जीएसटी कलेक्शन २.१ लाख कोटी रुपये झाले होते. गेल्या ३ महिन्यांतील जीएसटी वाढ कमी आहे. मात्र, गेल्या तिमाहीपेक्षा जीएसटी कलेक्शन चांगले राहिले आहे.
ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत जीएसटीचे कलेक्शन सरासरी १.८२ लाख कोटी राहिले. यापूर्वी जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत सरासरी कलेक्शन १.७७ लाख कोटी रुपये होते. गेल्या तिमाहीच्या तुलनेत या तिमाहीत ८.३ टक्के वाढ दिसून आली. महाराष्ट्र राज्यातून जीएसटीचे कलेक्शन सर्वाधिक झाले. महाराष्ट्रातून २९२६० कोटींचा जीएसटी जमा झाला. २०२३ मध्ये जीएसटी कलेक्शन २६८१४ कोटी रुपये होते. महाराष्ट्रानंतर सर्वाधिक जीएसटी जमा करणा-या राज्यांमध्ये कर्नाटक तामिळनाडू, गुजरात, हरियाणा या राज्यांचा क्रमांक लागतो.
जीएसटी वसुलीत वाढ -
केंद्रीय अर्थमंंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशांतर्गत जीएसटी वसुलीत ८.४ टक्के वाढ झाली आहे, तर आयात वस्तूंच्या जीएसटी वसुलीत ३.९ टक्के वाढ नोंदली गेली आहे. त्यामुळे डिसेंबरमध्ये जीएसटी संकलन वाढले असून, केंद्र सरकारची तिजोरी भरण्यास मदत झाली आहे.
No comments:
Post a Comment