अपघातास कारणीभूत व्यक्तीवर गुन्हा दाखल - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 December 2024

अपघातास कारणीभूत व्यक्तीवर गुन्हा दाखल


मुंबई - मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाजवळ एलिफंटा बेटावर जाणा-या नीलकमल नावाच्या प्रवासी जहाजाला नौदलाच्या जहाजाची धडक बसून मोठा अपघात झाला. या दुर्घटनेत आतापर्यंत तीन नौदल कर्मचा-यांसह एकूण १३ जणांचा मृत्यू झाल्याचे अधिका-यांनी सांगितले. इतर १०१ प्रवासी वाचले असल्याचे सांगण्यात येत आहे. तर अनेकांचा शोध सुरू आहे. तर दोघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर नौदलाच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी पोलिसांनी नौदलाच्या स्पीड बोट चालक आणि इतर जबाबदार लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कलम १०६(१), १२५(अ)(ब), २८२, ३२४(३)(५) अन्वये तपास सुरू केला आहे. या घटनेनंतर नेव्हीच्या पेट्रोलिंग बोटवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्या व्यक्तीने बोट धडकल्याचा तो व्हिडीओ काढला, त्याच व्यक्तीच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

नाथाराम चौधरी असे तक्रार दाखल करणा-या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी स्पीड बोट वरील चालक आणि संबंधितांवर गुन्हा दाखल झाला आहे. कुलाबा पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघाताला कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोटीमध्ये सुमारे ११० लोक होते, मात्र नेमक्या संख्येची पुष्टी होऊ शकली नाही. ही बोट मुंबईतील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या एलिफंटा बेटाकडे जात असताना दुपारी चारच्या सुमारास एका छोट्या बोटीला धडक बसली आणि बोट उलटली. या घटनेनंतर लगेचच जारी करण्यात आलेल्या व्हीडीओमध्ये बचावकार्य सुरू असल्याचे दिसून आले आहे.

अपघात कसा घडला?
मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियातून प्रवाशी नीलकमल ही बोट एलिफंटाकडे जात होती. यावेळी त्याच ठिकाणी समूद्रात नेव्हीच्या बोटीच्या नवीन इंजिनचे टेस्टिंग सुरू होते. त्यामुळे ही बोट समुद्रात आठ या आकारात फिरत होती. त्याचवेळी एक राऊंड मारून आलेल्या या बोटीने समोरून नीलकमल या बोटीला धडक मारली. नवीन इंजिनमध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड झाल्यानंतर या बोटीवरचे नियंत्रण सुटले आणि तिने नीलकमल या बोटीला समोरून धडक दिल्याची माहिती नेव्हीने दिली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad