मुंबई - एफ दक्षिण विभागातील फॉसबेरी जलाशयाला पाणीपुरवठा करणाऱ्या ६०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीस आज अचानक गळती सुरू झाली. रे रोड बीपीटी गोदाम नजीक उद्भवलेली पाणी गळती रोखण्यासाठी जलवाहिनी दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर हाती घेण्यात आले आहे. तथापि, या ठिकाणी सुरू असलेल्या दुरुस्ती कामात अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे दुरुस्तीचे काम स्वहस्ते (मॅन्युअली) करण्याचा निर्णय जलकामे विभागाने घेतला आहे.
जलवाहिनी दुरुस्तीचे काम वेगाने सुरू असून ते उशिरापर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. या गळतीमुळे एफ दक्षिण विभागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे एक दक्षिण विभागातील शिवडी पूर्व, दारूखाना, इंदिरानगर तसेच नजीकच्या परिसरात सोमवार दिनांक ३० डिसेंबर २०२४ रोजी होणारा सायंकाळी सहा ते रात्री ८:४० या नियोजित वेळेत होणारा पाणीपुरवठा होऊ शकला नाही. तसेच मंगळवार दिनांक ३१ डिसेंबर २०२४ रोजी आंबेवाडी तसेच दत्ताराम लाड मार्ग येथे पहाटे चार ते सकाळी ६:४५ या वेळेत होणारा पाणीपुरवठा होणार नाही. नागरिकांनी उपरोक्त कालावधीत पाणी जपून आणि काटकसरीने वापरावे व बृहन्मुंबई महानगरपालिकेत सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment