मुंबई - मुंबईत काल (18 डिसेंबर) गेटवे ऑफ इंडियाच्या जवळ नीलकमल ही फेरी बोट समुद्रात बुडाली. या बोटीमधून 105 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले असून 13 जणांचा मृत्यू झाला आहे. भारतीय नौदलाच्या नौदल क्राफ्टने नीलकमल या फेरी बोटीस दिलेल्या धडकीमुळे हा अपघात झाल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली. घटनास्थळी अद्याप नौदलामार्फत शोध कार्य सुरु आहे. (Mumbai Boat Accident)
मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १८.१२.२०२४ रोजी सायंकाळी ३.५५ च्या सुमारास गेट वे ऑफ इंडिया येथून एलिफंटा लेणी बारापूरी, ता. उरणकडे जाणा-या जलमार्गावर बुचर आयलंड जवळ मुंबई चैनलमध्ये नीलकमल या प्रवासी बीटीला भारतीय नौदलाच्या क्राफ्टने धडक दिल्यामुळे अपघात झाला. सदर अपघात गेट वे ऑफ इंडिया पासून ५ नॉटीकल माईल्स अंतरावर समुद्रात (अक्षांश १८.९२१८६९. व रेखांश ७२.८६६१९८) या ठिकाणी घडला. सदर ठिकाण मुंबई विश्वस्त बंदर यांच्या हद्दीत येते, नौवल क्राफ्टच्या इंजिनाची चाचणी करत असताना चालकाचे क्राफ्टवरील नियंत्रण सुटल्यामुळे या क्राफ्टने कारंजा येथे नीलकमल या बोटीस धडक दिल्याचे नौदलाने म्हटले आहे. धडकेमुळे समुद्रात पडलेल्या पर्यटकांचे शोध व बचाव कार्य तटरक्षक दल आणि सागरी पोलीमाच्या समन्वयाने तातडीने हाती घेण्यात आले. चार नौदल हेलिकॉप्टर, ११ नौदल काफ्ट, एक तटरक्षक नौका आणि तीन सागरी पोलीस नौका बचावकार्य करित होत्या,
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागास सदर घटनेची माहिती प्राप्त होताच नौदलाच्या अधिका-यांशी समन्वय साधून तातडीने १०८ वैद्यकिय मदतसेवेच्या १४ रुग्णवाहिका नौदल डॉकयार्ड येथे रवाना करण्यात आल्या. महाराष्ट्र आसनाच्या जे जे, जी टी व सेंट जॉर्ज रुग्णालयांच्या तसेच महानगरपालिकेच्या नायर रुग्णालय व खाजगी बॉम्बे रुग्णालयाच्या अपघात विभागांना सतर्क ठेवण्यात आले.
सर्व बचाव यंत्रणांमार्फत नीलकमल बोटीवरील व नौदल क्राफ्टवरील एकूण १०५ लोकांना बाहेर काढण्यात आले व त्यांना जेएनपीटी, आयएनएचएस संघानी रुग्णालय करंजा, सेंट जॉर्ज रुग्णालय, अश्विनी नौदल रुग्णालय येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले. १०५ पैकी १३ लोकांचा मृत्यु झाला आहे.
रुग्णांची प्रकृती कशी ?
जे एन पी टी रुग्णालय, उरण येथे दाखल करण्यात आलेल्या ५६ व्यक्तींवर प्राथमिक उपचार करुन त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. आय एन एच एस संघानी रुग्णालय, करंजा येथे दाखल १३ व्यक्तींपैकी १० व्यक्ती मृत तर इतर २ व्यक्तींना उपचारानंतर घरी पाठविण्यात आले आहे तर १ व्यक्तीग उपचारार्थ अश्विनी रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे. सेंट जॉर्ज रुग्णालयातील १० व्यक्तींपैकी व्यक्तींना उपचार करुन घरी पाठविण्यात आले आहे, इतर ३ व्यक्तींची प्रकृती स्थिर आहे. अश्विनी रुग्णालय येथे दाखल २ व्यक्तींची प्रकृती स्थिर आहे.
No comments:
Post a Comment