मुंबई - मुंबई पालिकेच्या शिक्षणाधिकारी (माध्यमिक) या पदावरील राजू तडवी यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. त्यामुळे हे पद रिक्त झाले असून या पदावर सुजाता राजेंद्रकुमार खरे, उपशिक्षणाधिकारी (मध्यवर्ती) यांची 23 डिसेंबर 2024 पासून नियुक्ती करण्यात आलेली आहे.
सुजाता राजेंद्रकुमार खरे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेतील शिक्षण विभागामध्ये प्रशिक्षिक प्रशिक्षक ते उप शिक्षणाधिकारी यामधील विविध पदावर जबाबदारीपुर्वक वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार पदभार सांभाळला असून त्यांनी उप शिक्षणाधिकारी (मध्यवर्ती) या पदाचा कार्यभार हाती घेतल्यापासून प्रशासनातील विविध पदाच्या पदोन्नत्या/नियुक्त्या, सुमारे 1040 पदांवर शिक्षण सेवक या पदाची भरती प्रक्रिया, ऑनलाईन पोर्टलद्वारे प्रशिक्षित प्रशिक्षक यांच्या बदल्या इत्यादी अनेक उल्लेखनीय कामगिरी पार पाडलेली आहे.
राजू अमिर तडवी, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) ह्यांच्या स्वेच्छानिवृत्तीमुळे रिक्त असलेल्या शिक्षणाधिकारी (माध्यमिक) या पदाचा कार्यभार अनेक दिवस रिक्त होता. यामुळे प्रशासकीय यंत्रणेवर अतिरिक्त दबाव पडत होता. अनेक कामे प्रलंबित होती. मात्र आता खरे यांच्या नियुक्तीमुळे शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
No comments:
Post a Comment