नागपूर / मुंबई - समाजवादी पार्टीचे आमदार रईस शेख यांनी मंगळवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे अधिवेशना दरम्यान आमदारांची बायोमेट्रिक पद्धतीने उपस्थिती नोंदवण्याची मागणी केली. यामुळे अनेकदा सही करण्यासाठी आमदारांच्या रांगा लागलेल्या टाळता येतील, असे त्यांनी नमुदे केले.
नार्वेकर यांना लिहिलेल्या पत्रात शेख यांनी नमूद केले की, महाराष्ट्र विधिमंडळाचा कारभार पूर्णपणे पेपरलेस करण्यात आला आहे. तसेच विधिमंडळ सभागृहाचे कामकाज डिजिटल झालेले आहे. त्याचा आम्हा सदस्यांना अभिमान आहे. असे असताना आमदारांना आजही सही करून आपली दैनंदिन उपस्थिती नोंदवावी लागते, याकडे शेख लक्ष वेधले.
विधानसभेतील आणि विधानपरिषदेसाठी आमदारांची दैनंदिन उपस्थिती सध्या हस्ताक्षरांनी नोंदवली जात आहे. आमदारांना घाई असते, त्यामुळे उपस्थिती नोंदवण्यासाठी लांब रांगा लागतात, असे शेख यांनी सांगितले.
आमदारांना आपली उपस्थिती बायोमेट्रिक पद्धतीने नोंदवण्याची सुविधा विधिमंडळ प्रशासनाने उपलब्ध करून द्यावी. जेणेकरून आमदारांचा किंमती वेळ वाचेल आणि विधिमंडळाचे मनुष्यबळ सुद्धा वाचेल. त्याचबरोबर आपल्या विधिमंडळाचा कारभार पूर्णपणे डिजिटल होईल, असेही शेख यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment