मुंबई - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे देशभरातील बहुजनांचे संघर्षनायक, लोकनेते म्हणून लोकप्रिय आहेत. संघर्षनायक रामदास आठवले यांचा 25 डिसेंबर हा वाढदिवस रिपब्लिकन पक्षाच्यावतीने दरवर्षी देशभर संघर्षदिन म्हणून साजरा केला जातो. येत्या 25 डिसेंबर 2024 रोजी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा वाढदिवस संघर्षदिन म्हणून देशभर साजरा करण्यात येत आहे. रिपब्लिकन पक्षाच्यावतीने देशभरात सर्व राज्यात आणि जिल्हयांमध्ये आठवले यांच्या वाढदिवसानिमीत्त गरिब गरजूंना मोफत अन्न, वस्त्र, शाल, चादर ब्लँकेट, कपडे यांचे वाटप केले जाणार आहे .तसेच देशभर रक्तदान, आरोग्य तपासणी, मोफत औषधोपचार असे अनेक सामाजिक उपक्रम राबवुन संघर्ष दिन साजरा करण्यात येणार आहे.
संघर्षनायक केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा वाढदिवस संघर्ष दिन म्हणून साजरा करतांना मुंबईसह सूंपर्ण महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशात विविध जिल्हयांमध्ये रिपब्लिकन कार्यकर्त्यांच्या वतीने विविध ठिकाणी रक्तदान शिबीर, विविध रुग्णालयांमध्ये फळ वाटप करण्यात येणार आहेत. तसेच अनेक बुध्द विहारांमध्ये लाडुंचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच अनेक गरिबांना थंडीपासून वाचण्यासाठी चादर, ब्लँकेटचे वाटप करण्यात येणार आहे. आणि गोरगरिब विद्यार्थ्यांना एक वही एक पेन सुध्दा वाटप करुन आठवले यांचा वाढदिवस संघर्षदिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे.
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या राजकीय वाटचालीमध्ये अत्यंत कठीण संघर्ष केला आहे. त्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना संघर्षनायक नेते म्हणून गौरविले जाते. त्यामुळे आठवले यांचा वाढदिवस संघर्ष दिन म्हणून रिपब्लिकन पक्षाच्यावतीने देशभर साजरा केला जातो. संघर्ष दिनानिमीत्त रिपब्लिकन कार्यकर्त्यांच्यावतीने विविध ठिकाणी समाजपयोगी उपक्रम राबवले जातात, अशी माहिती रिपब्लिकन पक्षाचे प्रसिद्धी प्रमुख हेमंत रणपिसे यांनी दिली आहे.
No comments:
Post a Comment