युवतीचा हरवलेला मोबाईल पंतनगर पोलिसांनी काही तासात शोधला - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 December 2024

युवतीचा हरवलेला मोबाईल पंतनगर पोलिसांनी काही तासात शोधला


मुंबई - मोबाइल हरवला की परत मिळत नाही असा अनुभव नागरिकांना येत असतो. मात्र घाटकोपर पंतनगर येथील युवतीला तिचा आय फोन १२ हरवलेला मोबाईल काही तासात परत मिळाला आहे. घाटकोपर येथील पंतनगर  पोलिसांनी युवतीचा मोबाइल काही तासात शोधला आहे. प्रभारी वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या आदेशाने पीडित युवतीला परत करण्यात आला. 

मिळालेल्या माहितीनुसार, दोन डिसेंबर रोजी पंतनगर पोलीस हद्दीत राहणाऱ्या एका युवतीचा आय फोन १२ हा मोबाइल हरवल्याची तक्रार पंतनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर आहवाड यांनी मोबाइल हरवलेल्या पथकाचे हेड कॉन्स्टेबल संतोष गीध यांना या प्रकरणाचा तपास सोपवला. पोलीस हवालदार संतोष गीध या प्रकरणाचा तपास करत पीडित युवतीचा मोबाइल ट्रेस करून तो तीन डिसेंबर रोजी जप्त केला. महिला पोलीस उपनिरीक्षक मैना चट आणि पोलीस निरीक्षक अहिरे यांच्या उपस्थितीत पोलीस हवालदार संतोष गीध यांनी पीडित युवतीला तिचा आय फोन १२ हा मोबाइल परत केला. आपला  मोबाईल परत मिळाल्याने सदर युवतीने पंतनगर पोलीस ठाण्यातील संबंधित सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad