नागपूर/मुंबई - राज्यात विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना (Ladki Bhaeen Yojana) गेमचेंजर ठरली आहे. सध्या या योजनेतून महिलांना दरमहा 1500 रुपये मिळत आहेत. पुढच्या आर्थिक वर्षापासून म्हणजेच एप्रिल पासून महिलांना दरमहा 2100 रुपये मिळणार आहे. महायुती सरकारने नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात तशी माहिती दिली आहे. तसेच योजनेसाठी आर्थिक तरतूद केल्याने डिसेंबरच्या हफ्ता महिलांच्या बँक खात्यात लवकरच जमा होणार आहे.
लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती समोर येत आहे, ती म्हणजे हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महायुती सरकारनं लाडक्या बहिणींना मोठी ओवाळणी दिली आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 35 हजार 788 कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर झाल्या आहेत, त्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजेनासठी 1400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यासोबतच मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना 3050 कोटी, सार्वजनिक बांधकाम विभागातील रस्ते व पूल बांधणीसाठी 1500 कोटी रुपये, मोदी आवास घरकुल योजनेसाठी 1250 कोटी, मुंबई मेट्रोसाठी अर्थ सहाय्य म्हणून 1212 कोटी, आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी 514 कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे.
राज्यात पुन्हा एकदा आमचं सरकार आलं तर आम्ही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दर महिन्याला 2100 रुपये जमा करू अशी घोषणा महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात आली होती. आता राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे, त्यामुळे 2100 रुपये कधीपासून खात्यात जमा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. येत्या अर्थसंकल्पामध्ये त्यासाठी तरतुद केली जाईल, ही योजना सुरूच राहणार असून कधीही बंद होणार नाही अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. त्यामुळे आता पुढच्या वर्षीच लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळण्याची शक्यता आहे.
No comments:
Post a Comment