कुर्ल्यात बेस्ट बसने 20 जणांना चिरडले, 3 जणांचा मृत्यू - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 December 2024

कुर्ल्यात बेस्ट बसने 20 जणांना चिरडले, 3 जणांचा मृत्यू


मुंबई - सर्वसामान्य मुंबईकरांची लाईफलाईन म्हणून ओळख असलेली बेस्ट आज डेथलाईन ठरली आहे. कुर्ला पश्चिम आंबेडकर नगर येथे एका कंत्राटी  बसने रस्त्यावरील नागरिकांना आणि वाहनांना धडक दिल्याने 20 जण जखमी झाले. त्यापैकी 3 जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात भीषण असल्याने मृत्यूच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, बेस्ट बस रूट क्र. 332 कुर्ला स्थानक येथून अंधेरीकडे जात होती. रात्री 10. 30 वाजता बस कुर्ला पश्चिम रेल्वे स्टेशन रोडवरील आंबेडकर नगर येथे आली असता बेस्टचा भीषण अपघात झाला. बेस्ट बसने रस्त्यावर चालणाऱ्या नागरिकांना आणि वाहनांना धडक दिली. या भीषण अपघातात 20 जण जखमी झाले. त्यांना जवळच्या पालिकेच्या भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर काहींना सायन रुग्णालयात पाठवण्यात आले. त्यातील 3 जणांचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला होता. अपघातात जखमी झालेल्यांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा अपघात ब्रेक फेल झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र बेस्टची ही बस खासगी कंत्राटदाराची होती. अपघातामधील ड्रायव्हर अपघात झाला तेव्हा दारू प्यायला होता अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे पोलिसांच्या चौकशीतून हा आपघात कशामुळे झाला हे समोर येवू शकेल. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad