परभणीतील संविधान विटंबनेनंतर उसळलेल्या दंगलीबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 December 2024

परभणीतील संविधान विटंबनेनंतर उसळलेल्या दंगलीबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश


नागपूर - परभणी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधानाच्या प्रतिकृतीला बाधा पोहचविल्याच्या घटनेबाबत महाराष्ट्र अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष अॅड. धर्मपाल मेश्राम यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. घटनेची सखोल चौकशी करुन वस्तुनिष्ठ तपशीलवार अहवाल आयोगाकडे तत्काळ सादर करण्याचे निर्देश अॅड. मेश्राम यांनी पत्राव्दारे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना दिले आहेत.

परभणी येथे 10 डिसेंबर रोजी घडलेल्या घटनेबाबत वृत्तपत्रात जे वृत्तांकन आले व घटनेनंतरच्या उसळलेल्या दंगलीसंदर्भात तपशीलवार माहिती सादर करण्याचे लेखी पत्र निर्गमित करण्यात आले आहे. ॲड. मेश्राम हे परभणी जिल्हा दौरा लवकरच करणार आहेत. परभणीच्या सामाजिक न्याय विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी या घटनेबाबत स्वतंत्र अहवाल तत्काळ सादर करावा असे देखील निर्देश आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी दिले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad