हातात संविधान, जयभीमची घोषणा.. राऊत यांची विधानसभा सदस्य पदाची शपथ - JPN NEWS

Home Top Ad

Post Top Ad

08 December 2024

demo-image

हातात संविधान, जयभीमची घोषणा.. राऊत यांची विधानसभा सदस्य पदाची शपथ

nitin%20raut

मुंबई/नागपूर - विधानसभेच्या विशेष अधिवेशन सत्रात आज उत्तर नागपूरचे आमदार डॉ. नितीन राऊत यांनी पाचव्यांदा विधानसभा सदस्य म्हणून भारतीय संविधानाशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतली. यावेळी डॉ. राऊत यांनी संविधान हातात धरून जयभीमची घोषणा देत संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान बुद्ध यांचा नामोल्लेख करून विधानसभेत पाचव्यांदा आमदारकीची शपथ घेतली.

काल ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित करत विरोधी पक्षाच्या आमदारांनी शपथ न घेण्याचा निर्णय जाहीर केला होता. परंतु आज काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि उत्तर नागपूरचे आमदार डॉ. राऊत यांनी मी, डॉ. नितीन तुळजाबाई काशिनाथ राऊत या प्रकारे नाव घेऊन आईचा देखील मान राखला. प्रसंगी तथागत भगवान गौतम बुद्ध साक्ष आणि संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आज विधिमंडळाच्या तीन दिवसीय विशेष अधिवेशनात संविधान हातात घेऊन पाचव्यांदा विधानसभा सदस्य म्हणून भारतीय संविधानाशी एकनिष्ठ राहण्याची शपथ डॉ. राऊत यांनी घेतली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages