मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली स्वाक्षरी वैद्यकीय मदतीच्या फाईलवर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 December 2024

मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली स्वाक्षरी वैद्यकीय मदतीच्या फाईलवर


मुंबई - मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या फाईलवर केली.

पुणे येथील रुग्ण चंद्रकांत शंकर कुऱ्हाडे यांना पाच लाखाची मदत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून देण्याचे निर्देश त्यांनी फाईलवर दिले आहेत. चंद्रकांत कुऱ्हाडे यांच्या पत्नीने बोन मॅरो ट्रान्सप्लांट उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य देण्याची विनंती केली होती.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad