मंत्रिमंडळ शपथविधीच्या दिवशी भीम आर्मीचे ईव्हीएम विरोधात पुन्हा आंदोलन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 December 2024

मंत्रिमंडळ शपथविधीच्या दिवशी भीम आर्मीचे ईव्हीएम विरोधात पुन्हा आंदोलन


मुंबई - विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात विविध पक्ष आणि सामाजिक संघटनांचा ईव्हीएम विरोधात रोष वाढत चालला आहे. पुण्यात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव (Baba Aadhav) यांनी ईव्हीएम विरोधात आंदोलन सुरू केले असतानाच भीम आर्मी भारत एकता मिशन (Bheem Army) या सामाजिक संघटनेने शनिवारी 30 नोव्हेंबरला मुंबईच्या दादर येथे ईव्हीएम जोरदार आंदोलन करीत स्वाक्षरी मोहीम राबविली. येत्या 5 डिसेंबरला मंत्रिमंडळ शपथविधीच्या (cabinet swearing-in ceremony) दिवशी ईव्हीएम (EVM) विरोधात पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा भीम आर्मीने दिला आहे. (Bhim Army protests again against EVM) 

भीम आर्मीचे मुंबई अध्यक्ष अविनाश गरुड यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी दादर पूर्व रेल्वे स्थानक येथे ईव्हीएम विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलन केले. ईव्हीएम हटाव,देश बचाव, बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, अशी घोषणाबाजी यावेळी आंदोलकांनी केली. सदर प्रसंगी 'ईव्हीएम नको बॅलेट पेपर हवा' या टॅग लाईन खाली बॅनरवर स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सह्या करीत आपला सहभाग नोंदविला. यावेळी भीम आर्मीचे राष्ट्रीय महा सचिव अशोक कांबळे, माजी राज्य कार्याध्यक्ष सुनील गायकवाड, मुंबई प्रदेश भीम आर्मीचे दिनेश शर्मा यांच्या सह कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. पोलिसांनी यावेळी आंदोलकांना अटक केली. हे आंदोलन यापुढे आणखी तीव्र करण्याचा इशारा अशोक कांबळे यांनी दिला. 

5 डिसेंबरला पुन्हा आंदोलन - 
दरम्यान दादर पूर्व रेल्वे स्टेशन जवळ स्वामीनारायण मंदिर या ठिकाणी EVM विरोधी संविधानिक मार्गाने आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन दडपण्याचे काम पोलिसांच्या मार्फत भाजपने केले. आंदोलनकर्त्यांना माटुंगा पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या निषेधार्थ 5 डिसेंबर मंत्रिमंडळाच्या शपथविधीच्या दिवशी राज्यव्यापी EVM  विरोधात पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा अशोक कांबळे यांनी दिला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad