मुंबई - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत बोलत असताना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अवहेलना करणारे वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ भीम आर्मी मुंबई प्रदेश च्या वतीने राजगृह ते दादर पूर्व रेल्व स्थानक असा निषेध मार्च तसेच निदर्शने केली.
अमित शाह यांनी आपल्या वक्तव्याबाबत माफी मागावी तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांचा राजीनामा घेऊन बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आपला आदर व्यक्त करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. विरोधकांवर टीका करीत असता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख करीत बाबासाहेब यांच्या ऐवजी देवाचे नाव घेतल्यास स्वर्गात जागा मिळेल असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा देशभरात निषेध केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुंबईत भीम आर्मीने मुंबई अध्यक्ष अविनाश गरूड यांच्या नेतृत्वात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दादर येथील निवासस्थान राजगड ते दादर रेल्व स्थानक असा निषेध मार्च काढला. दादर रेल्वे स्थानकाबाहेर यावेळी निदर्शने करण्यात आली. यावेळी भीम आर्मीचे राष्ट्रीय सरचिटणीस अशोक कांबळे, माजी कार्याध्यक्ष सुनील गायकवाड, दिनेश शर्मा, अय्याज पंसारी, रवि बागुल, विजय कांबळे, राजकुमार साळे, सुरेश धाडी, प्रकाश पाईकराव, प्रकाश ईंगवले, तुषार कदम यांच्यासह शेकङो पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment