मुंबई - कुर्ला पश्चिम येथे काही दिवसापूर्वी बेस्ट बसचा अपघात झाला होता. यात 9 जणांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच आज घाटकोपर पश्चिम येथे एका टेम्पोने धडक दिल्याने एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर चार जण जखमी झाले आहेत. अपघाताप्रकरणी पोलिसांनी टेम्पो चालकाला घाटकोपर पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
घाटकोपर पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, आज दिनांक 27/12/2024 रोजी 18:30 वाजताच्या दरम्यान आझाद मसाला शॉप समोर, मच्छी मार्केट रोड, चिराग नगर, घाटकोपर, मुंबई. येथे टाटा कंपनीचा छोटा टेम्पो क्रमांक MH 05 EL 1951 चा चालक नामे उत्तम बबन खरात. वय 25 वर्ष, धंदा चालक याचा टेम्पो चालवत असताना स्टेरिंग वरील ताबा सुटल्याने रस्त्याने जाणारे पादचाऱ्यांना टेम्पोची धडक लागली.
सदर अपघातामध्ये प्रीती रितेश पटेल वय 35 वर्ष राहणार भागीरथी चाळ, पारशीवाडी, घाटकोपर पश्चिम मुंबई हिचा मृत्यू झाला आहे. तसेच इतर तीन महिला व एक पुरुष जखमी झाले आहेत. रेश्मा शेख वय 23 वर्ष, मारूफा शेख वय 27 वर्ष, तोफा उजहर शेख वय 38 वर्षे , मोहरम अली अब्दूल रहीम शेख वय 28 वर्षे सर्व जण राहणार - चिराग नगर, पारशीवाडी, मच्छी मार्केट, घाटकोपर पश्चिम मुंबई यांना मुकामार व किरकोळ दुखापती झाल्या असून त्यांना तात्काळ राजवाडी रुग्णालय येथे उपचाराकरीता दाखल केले आहे. टेम्पो चालक व टेम्पो ताब्यात घेण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment