मुंबई - राज्यात विधानसभा निवडणुकीत (VidhanSabha Election 2024 Result) महायुतीतील तिन्ही पक्षांनी एखत्रितपणे 230 जागा जिंकल्या आहेत. विधानसभा निवडणुकीत लोकांचा मिळालेला प्रतिसाद पाहता, लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे (Municipal Election) बिगुल वाजण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात महापालिकेसह इतरही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. अशा अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार प्रशासकांमार्फत चालवला जात आहे. त्यामुळे येथे लवकरात लवकर निवडणूक घेऊन लोकप्रतिनीधींच्या मार्फत विकासकामांना गती द्यावी, अशी मागणी केली जात आहे. असे असतानाच आता विधानसभा निवडणुकीतील निकालानंतर आगामी काळात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगूल वाजण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
विधानसभा निवडणुकीत कोणाला किती जागा?
महायुती -
भाजपा- 132
शिवसेना (शिंदे गट)- 57
राष्ट्रवादी (अजित पवार गट)- 41
महाविकास आघाडी -
काँग्रेस- 16
राष्ट्रवादी (शरद पवार गट)- 10
शिवसेना (ठाकरे गट)- 20
समाजवादी पार्टी- 2
No comments:
Post a Comment