पराग शहांची संपत्ती पाच वर्षात ५७५ टक्क्यांनी वाढली - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 نوفمبر 2024

पराग शहांची संपत्ती पाच वर्षात ५७५ टक्क्यांनी वाढली



मुंबई - भाजपचे (BJP) घाटकोपर पूर्वचे (Ghatkopar East) उमेदवार पराग शहा (Parag Shah) हे राज्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. त्यांनी निवडणूक आयोगाला (election Commission) दिलेल्या प्रतिज्ञापत्रात ३३८३.०६ कोटी रुपयांची संपत्ती दाखवली आहे. गेल्या पाच वर्षांत त्यांची संपत्ती ५७५ टक्क्यांनी वाढली आहे. २०१९ मधील शपथपत्रात त्यांनी ५००.६२ कोटी असल्याचे जाहीर केले होते. (Parag Shahs wealth increased) (Political News) (Mumbai News)

मुंबई महानगरपालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १३२ मधून भाजपचे पराग शहा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यांनी स्थायी समितीचे सदस्य म्हणून काम पाहिले आहे. २०१९ च्या निवडणुकीत विधानसभा मतदारसंघातून भाजपचे घाटकोपर पूर्व येथील आमदार आणि माजी मंत्री प्रकाश मेहता यांच्या जागी पराग शहा यांना उमेदवारी देण्यात आली होती. पराग शाह २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांचा व्यवसाय रिअल इस्टेट डेव्हलपर्सचा आहे.

पराग शहा यांनी २०१७ मध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक लढवताना आपले उत्पन्न ६९० कोटी दाखवले होते. त्यावेळी ते मुंबई महापालिकेतील सर्वात श्रीमंत नगरसेवक ठरले होते. त्यानंतर २०१९ मध्ये विधानसभा निवडणूक लढवताना त्यांची संपत्ती कमी झाली होती. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी दिलेल्या शपथपत्रात पराग शहा यांनी स्वतःच्या आणि पत्नीच्या नावे ३३८३.०६ कोटी रुपयांची संपत्ती दाखवली आहे. पराग शहा यांच्याकडे २१७८.९८ तर त्यांच्या पत्नी मानसी यांच्याकडे ११३६ कोटींची संपत्ती आहे. त्यांचे बहुतांश उत्पन्न हे शेअर्स आणि इतर गुंतवणुकीच्या रूपात आहे.

ليست هناك تعليقات:

إرسال تعليق

Post Bottom Ad

JPN NEWS