मुंबई - वांद्रे कुर्ला मेट्रो स्थानकात आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. वांद्रे ते आरे कॉलनी हा पहिला टप्पा नुकताच सुरु करण्यात आला होता. त्यापैकी बीकेसीमधील मेट्रो स्टेशनला आज आग लागली. या आगीमुळे काही काळ सर्वत्र धुळाचे लोळ उठले होते. त्यामुळे काही काळ मेट्रो सेवा थांबवण्यात आली होती. (Mumbai BKC Metro Fire)
मिळालेल्या माहितीनुसार, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) मध्ये मेट्रो स्टेशनचे काम सुरू आहे. या परिसरात आज दुपारी 1 वाजून 9 मिनिटांच्या सुमारास आग लागली. या भूमिगत मेट्रो स्थानकातील तळघरात ठेवलेले लाकडी साहित्य आणि फर्निचर यांना ही आग लागली. यामुळे मोठ्या प्रमाणात धुराचे लोळ पसरले. आगीची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दल आणि स्थानिक पोलिसांनी अडकलेल्या प्रवाशांना अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशनमधून बाहेर काढले. आगीवर दुपारी ३ वाजून १५ मिनिटांनी नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. या अगीमध्ये कोणीही जखमी झाले नाही.
मेट्रो प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आगीमुळे वांद्रे कुर्ला संकुलात आत आणि बाहेर जाण्याचा परिसर बंद करण्यात आला होता. काही काळासाठी मेट्रो सेवा थांबवण्यात आली होती. सगळे प्रवासी सुखरुप आहेत. तात्पुरत्या स्वरुपात बांद्रा कॉलनी स्टेशनवरुन ग्राहकांना मेट्रो पकडण्याची मुभा देण्यात आली होती.
No comments:
Post a Comment