मुंबई - एसटी कर्मचाऱ्यांना (ST Workers) दिवाळी भेट रक्कम देण्यात सरकारी अधिकारी व एसटी प्रशासन दोघेही कमी पडले असून दैनंदिन प्रवाशी उत्पन्नातून सदरची रक्कम दिली असती तरी चालले असते असे मत महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे (Maharashtra ST Workers Congress) सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी व्यक्त केले आहे.
एसटी कर्मचाऱ्यांना दर वर्षी दिवाळी भेट म्हणून काही रक्कम देण्यात येते या वर्षी महामंडळाने कर्मचारी व अधिकारी यांना सरसकट ६००० रुपये इतकी रक्कम दिवाळी भेट म्हणून देण्यासाठी आचार संहिता लागू होण्या अगोदर म्हणजेच १५ ऑक्टोबर रोजी प्रशासनाने महामंडळाच्या अध्यक्षांकडे प्रस्ताव ठेवला होता. त्यांनी त्याला तात्काळ मंजूरी दिली व त्याला लागणारा ५२ कोटी रुपये इतका निधी मिळण्यासाठी सदर मागणीचा प्रस्ताव एसटी प्रशासनाने सरकारकडे पाठवला होता.
या प्रस्तावा संदर्भात महामंडळाने सरकारकडे वारंवार विचारणा करूनही सरकार कडून निधी उपलब्ध करून देण्यात आला नाही.व आता सरकारी अधिकाऱ्यांकडून आचार संहितेचे कारण सांगितले जात आहे. खरे तर हा निधी देण्यात काहीही अडचण असण्याचे कारण नाही. कारण आचारसंहिता लागू होण्या आधीच प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. व निधी मागणीचे पत्र सुद्धा आचार संहिता लागू होण्या अगोदरच पाठवले आहे. त्यामुळे आचारसंहितेचे कारण हा निधी न देण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांचा बनाव असल्याचा आरोपही केला बरगे यांनी केला आहे.
सरकारी अधिकारी व एसटी प्रशासन दोघेही उदासीन -
दिवाळी भेट देण्यासाठी निधी प्राप्त करून देण्यात सरकारी अधिकारी व एसटी प्रशासन दोघेही उदासीन असून त्यांनी ठरवले असते तर मार्ग निघू शकला असता. असा आरोपही बरगे यांनी केला आहे. आज भाऊबीज आहे. राज्यातील इतर अनेक आस्थापनातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या घरी भाऊबीज आनंदात साजरी केली असून अत्यावश्यक सेवा असल्याने एसटी कर्मचारी मात्र आपल्या घरी दिवाळीची सुट्टी न घालवता कामावर आहेत. व भाऊबीजेसाठी प्रवाशी भाऊ - बहिणींना उचित स्थळी जाण्यासाठी काबाड कष्ट करीत आहेत. अजूनही वेळ गेलेली नाही.एसटी कर्मचाऱ्याना सुद्धा दिवाळी आनंदात साजरी करता यावी यासाठी महामंडळाच्या दैनंदिन प्रवाशी उत्पन्नातून सदरची रक्कम तातडीने देण्यात यावी व आचार संहिता संपल्यावर सदरचा निधी सरकारकडून मागून घ्यावा असेही बरगे यांनी म्हटले आहे.
ليست هناك تعليقات:
إرسال تعليق