मुंबई - भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीकरिता २० नोव्हेंबर, २०२४ रोजी मतदान होणार आहे. मुंबई शहर जिल्ह्यात मतदानाकरिता मतदान केंद्रावर उपस्थित राहू शकत नसलेल्या व प्रपत्र १२ ड भरून दिलेल्या ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांना टपाली मतदान पथकामार्फत गृह टपाली मतपत्रिकेद्वारे मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सदर सुविधेअंतर्गत मुंबादेवी विधानसभा मतदारसंघात आज एकूण ११४ ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांनी गृह टपाली मतदान केले. (Elaction)(Voting)
मुंबादेवी विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील एकूण ११८ ज्येष्ठ नागरिक मतदार असून त्यापैकी १०३ अर्जदारांनी तर १३ पैकी ११ दिव्यांग मतदारांनी मुंबादेवी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे प्रपत्र १२ ड भरून जमा केले होते. प्रपत्र १२ ड भरून जमा केलेल्या ११४ अर्जदारांचे गृह टपाली मतदान आज घेण्यात आले. मुंबई शहर जिल्ह्यातील दहा मतदारसंघात ८५ वर्षावरील २१३७ ज्येष्ठ नागरिक मतदार व २१९ दिव्यांग मतदार गृह टपाली मतदानासाठी पात्र ठरले आहेत. १६ नोव्हेंबर २०२४ पर्यंत गृह टपाली मतदान घेतले जाणार आहे.
भारत निवडणूक आयोगाने ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांना घरून मतदान करण्याच्या उपलब्ध करून दिलेल्या सुविधेबद्दल समाधान व्यक्त करीत टपाली मतदान पथकाचे आभारही मानले.
No comments:
Post a Comment