मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अंधेरी - के पश्चिम विभागातील अंबोली हिंदू स्मशानभूमीतील दहनकक्ष दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे पारंपरिक दहनकक्षाची सेवा रविवार, दिनांक १ डिसेंबर २०२४ पासून बंद राहील. दुरूस्तीची ही कामे पूर्ण झाल्यानंतर सदर दहन कक्ष पुन्हा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तोवर, वेसावे (वर्सोवा) हिंदू स्मशानभूमी आणि ओशिवरा हिंदू स्मशानभूमीत देखील पारंपरिक दाहिनीचा पर्याय उपलब्ध आहे.
तथापि, अंबोली स्मशानभूमीत असणारी नैसर्गिक वायू दाहिनी (PNG Furnaces) पद्धतीची अंत्यविधी सेवा कार्यरत आहे, असे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'के पश्चिम' विभागातील वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्याद्वारे कळविण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment