मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) नेते आमदार रोहित पवार आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते खासदार अरविंद सावंत यांनी यांनी भिवंडी पूर्व येथील समाजवादी पक्षाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार रईस शेख यांना पाठिंबा जाहीर करत पक्ष कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना शेख यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले आहे. राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी या व्हिडिओ द्वारे पक्ष कार्यकर्ते तसेच मतदारांनी शेख यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून यावेळी भरघोस मताधिक्यानी निवडून देण्याचे आवाहन केले आहे.
आमदार झाल्यापासून रईस शेख यांनी मागील पाच वर्षात मतदारसंघातील सर्व सामान्य लोकांचे प्रश्न प्रामाणिकपणे विधानसभेत मांडले. मंत्री अधिकारी यांना भेटताना वेळ काळ न पाहता त्यांनी मतदार संघातील प्रश्न सोडविण्यासाठी, लोकांच्या प्रश्नासाठी लढण्याचे काम केले. त्यांना ह्या निवडणुकीत भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन यावेळी आमदार रोहित पवार यांनी केले आहे.
शिवसेनेचे नेते आणि खासदार अरविंद स्वांत यांनी रईस शेख हा भला माणूस असून त्यांना निवडून देण्याचे आवाहन शिवसैनिकांना केले आहे. शेख यांनी लोकसभेला माझ्या विजयात मोलाचा वाटा उचलला. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे आवडते आणि विश्वासू आमदार रईस शेख आहेत. महाराष्ट्रातील घाणेरडं सरकार घालवायचं असेल तर प्रत्येक उमेदवार निवडून देणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण सगळे एक होऊन महाविकास आघाडीची वज्रमूठ दाखवून रईस शेख यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन सावंत यांनी केले आहे.
सावंत पुढे म्हणाले की, शेख यांनी शिक्षणामध्ये क्रांती करण्याचे ध्येय ठेवले आहे. गोरगरीब मुलांना चांगलं शिक्षण मिळावे आणि शिक्षणाचा दर्जा उंचवावा यासाठी ते प्रयत्नशील आहेत. महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्नशील आहेत. अशा उमेदवाराला निवडून देणं आपला कर्तव्य आहे. महाविकास अगदी मजबूत करण्यासाठी त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन सावंत यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.
No comments:
Post a Comment