मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे चिरंजीव अमित ठाकरे (Amit Thackeray) माहीम येथून विधानसभा निवडणूक लढवत आहेत. आचारसंहिता सुरु असताना अमित ठाकरे यांनी दादर शिवाजी पार्क येथील दीपोत्सवाला भेट दिली. त्यामुळे त्यांनी आचारसंहिता भंग केल्याची तक्रार शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाला (Election Commission) केली होती. त्याची दखल घेऊन आचारसंहिता भंगाची तसचं कार्यक्रमाचा संपूर्ण खर्चाची चौकशी सुरू करण्यात आल्याच पत्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पाठवल आहे. (Political News)(Mumbai News)
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे कालच मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांना एक पत्र लिहून छत्रपती शिवाजी महाराज पार्क दादर येथे साजरा होत असलेल्या दीपोत्सव या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुरस्कृत कार्यक्रमात होत असलेल्या आचारसंहिता भंगाची तसेच सदर कार्यक्रमाचा संपूर्ण खर्च येथील स्थानिक माहीम विधानसभेचे मनसे उमेदवार अमित राज ठाकरे यांच्या निवडणूक खर्चात समाविष्ट करण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने मा.निवडणूक आयोगाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला या सर्व प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आल्याचे पत्र पाठविले आहे.
ليست هناك تعليقات:
إرسال تعليق