कुर्ला एसटी डेपोमधील खड्ड्यात पडून ७ वर्षाच्या मुलाचा मृत्यू - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 November 2024

कुर्ला एसटी डेपोमधील खड्ड्यात पडून ७ वर्षाच्या मुलाचा मृत्यू


मुंबई - कुर्ला एसटी डेपोमध्ये सुरू असलेल्या विकासकामांसाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून एका ७ वर्ष वयाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. उज्ज्वल रवी सिंग असे या मयत मुलाचे नाव असून तो बाजूच्या वत्सला ताई नाईक नगर या विभागात राहतो. (7-year-old boy dies after falling into a pit at Kurla ST depot)

आज दुपारी तो त्याच्या मित्रांसह कुर्ला डेपोच्या आत खुल्या जागेत खेळण्यास आला होता. यावेळी इथे इमारतीच्या निर्मितीसाठी खोदण्यात आलेल्या आणि पाण्याने भरलेल्या खड्ड्यात तो पडला. यावेळी त्याच्या सोबत असलेल्या त्याच्या मित्रांनी आरडाओरडा केला असता तिथे असलेल्या काही वाहन चालकांनी त्याला खड्ड्यात उतरून बाहेर काढले. उपचारासाठी त्याला राजावाडी रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच नेहरू नगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनेची माहिती घेऊन अकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad