गोंदिया - एसटी बस अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची मदत - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 November 2024

गोंदिया - एसटी बस अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची मदत

 

मुंबई - गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी जवळ शिवशाही एसटी बसच्या झालेल्या अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना एसटी महामंडळामार्फत 10 लाख रुपयांची मदत देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.

मुख्यमंत्री शिंदे यांनी गोंदिया जिल्हाधिकारी यांना संपर्क साधून या अपघातासंदर्भात माहिती घेतली. अपघातातील सर्व जखमींना त्वरित चांगल्या दर्जाचे उपचार देण्यात यावेत, आवश्यकता वाटल्यास जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल करावे, अशा सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. जखमींवर शासकीय खर्चातून मोफत उपचार करण्यात यावेत, अशी सूचना त्यांनी दिली. अपघाताची घटना अत्यंत दुर्दैवी असून मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad