मुंबई - विनाहेल्मेट दुचाकीस्वार व पाठीमागे बसलेल्या सहप्रवाशावर कारवाई करण्याचे आदेश राज्य वाहतूक विभागाचे अपर पोलिस महासंचालकांनी राज्यातील सर्व पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात विनाहेल्मेट प्रवास करणारे दुचाकीस्वार व सहप्रवाशांविरोधातील कारवायांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या दोन वर्षांत मुंबईत पोलिसांनी विनाहेल्मेट प्रवास केल्याप्रकरणी १७ लाख ७० हजार कारवायांमध्ये १०७ कोटी रुपये दंड आकारला आहे.
विनाहेल्मेट दुचाकीस्वार व सहप्रवासी यांचे अपघात, त्यात मृत्युमुखी, तसेच जखमी होणाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यामुळे विनाहेल्मेट दुचाकीस्वार व पाठीमागे बसलेला सहप्रवासी अशा दोघांवर कारवाई करण्याचे आदेश वाहतूक विभागाच्या अपर पोलीस महासंचालकांनी राज्यातील सर्व पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. त्यासाठी वाहतूक पोलिसांच्या ई-चलन यंत्रामध्ये बदल करून वेगळ्या नोंदी करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहे. त्यामुळे भविष्यात विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम राबण्यात येणार आहेत.
No comments:
Post a Comment