मुंबई - मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड आणि हार्बर मार्गावर पनवेल ते वाशीदरम्यान उद्या, रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. पश्चिम रेल्वेने चर्चगेट ते मुंबई सेंट्रलदरम्यान ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार असून, काही लोकल फेऱ्या २० ते २५ मिनिटे विलंबाने धावणार आहेत.
मध्य रेल्वेवर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.०५ पर्यंत माटुंगा- मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर असेल. या ब्लॉकदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.२५ ते दुपारी २.४५ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि त्यांच्या नियोजित थांब्यांवर थांबून गंतव्यस्थानावर १५ मिनिटे उशिरा पोहोचतील. ठाण्यापुढील जलद गाड्या मुलुंड येथे डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील.
ठाणे येथून सकाळी १०.५० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड येथे अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. मुलुंड आणि माटुंगा दरम्यान त्यांच्या नियोजित थांब्यावर थांबून पुढे माटुंगा स्थानकावर अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील व गंतव्यस्थानावर १५ मिनिटे उशिराने पोहोचतील. तर हार्बर मार्गावर पनवेल-वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ पर्यंत हा ब्लॉक असेल.
पनवेल येथून सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ वाजेपर्यंत सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे जाणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. पनवेल येथून सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ वाजेपर्यंत ठाण्याकडे जाणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत ठाणे येथे जाणाऱ्या डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील
No comments:
Post a Comment