मुंबई - चेंबूर सिद्धार्थ कॉलनी येथे एका दुकानात आज पहाटे आग लागली. या आगीत सात जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन मुलांचा समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Seven killed in fire in Chembur)
चेंबूर सिद्धार्थ कॉलनी प्लॉट नंबर 16/1 येथे एका दुकानाला पहाटे 5.20 वाजता आग लागली. आगीमुळे दुकान जळून खाक झाले. दुकानातील सर्व सामान जळाले. इमारतीचा तळमजला दुकान म्हणून आणि वरचा मजला निवासस्थान म्हणून वापरला जात होता. तळमजल्यावर असलेल्या दुकानातील विद्युत वायरिंग आणि इतर उपकरणांमध्ये आग लागली आणि नंतर वरच्या मजल्यावर पसरली. दुकानाच्या वरच्या मजल्यावर राहत असलेले गुप्ता कुटुंबातील 7 जण आगीत अडकले. त्यांना अग्निशमन दलाने बाहेर काढून महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. सकाळी 9.15 वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले.
झोन ६ चे डीसीपी हेमराज सिंग राजपूत म्हणाले, आम्हाला सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास आगीची माहिती मिळाली. दुकान तळमजल्यावर होते आणि कुटुंब वरच्या दोन मजल्यांवर राहत होते. या घटनेत सात जणांचा मृत्यू झाला असून, दोन जण जखमी झाले आहेत. आमचे पथक आणि अग्निशमन दलाचे पथक या घटनेचा तपास करत आहे आणि आग कशी लागली हे शोधण्याचा प्रयत्न करत आहे.
मृतांची नावे -
प्रेसी प्रेम गुप्ता (6 वर्ष)
अनिता धरमदेव गुप्ता (30 वर्ष)
अनिता धरमदेव गुप्ता (39 वर्ष)
प्रेम चेडिराम गुप्ता (30 वर्ष)
नरेंद्र गुप्ता (10 वर्ष)
विधी चेडिराम गुप्ता (15 वर्ष)
गितादेवी धरमदेव गुप्ता (60 वर्ष)
No comments:
Post a Comment