दहावीत ३५ ऐवजी २० गुण मिळविणारे पास होणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 أكتوبر 2024

दहावीत ३५ ऐवजी २० गुण मिळविणारे पास होणार


मुंबई - शाळेत लहानपणापासून गणित या विषयाचे नाव घेतले तरी भल्याभल्यांच्या पोटात गोळा येतो. अनेक विद्यार्थ्यांच्या मनात गणिताचा फोबिया असतो. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत गणित आणि विज्ञान या विषयांमध्ये ३५ पेक्षा कमी आणि २० पेक्षा जास्त गुण मिळाले, तरी अकरावीमध्ये प्रवेश घेता घेणार आहे. नव्या अभ्यासक्रम आराखड्यात यासंदर्भात तरतूद करण्यात आली.

दरम्यान, दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत गणित आणि विज्ञान या विषयांमध्ये ३५ पेक्षा कमी आणि २० पेक्षा जास्त गुण मिळाले, तरी असा विद्यार्थी पुढील शिक्षण घेऊ शकणार आहे. मात्र त्यांच्या रिझल्टवर एक विशिष्ट शेरा देण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता दोन पर्याय समोर येणार आहे.

एक म्हणजे प्रमाणपत्र घेऊन अकरावीसाठी प्रवेश घेणे किंवा पुन्हा परीक्षा देणे. मात्र हा पर्याय त्या विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांना पुढे गणित किंवा विज्ञान या दोन्ही विषयांवर आधारीत कोणतेही करिअर करायचे नाही. त्या विद्यार्थ्यांना हा नियम लागू होणार आहे. त्यामुळे ज्यांना विज्ञान किंवा गणित हे विषय घेऊन उच्च शिक्षण घ्यायचे नाही त्यांना याचा फायदा होणार आहे.

ليست هناك تعليقات:

إرسال تعليق

Post Bottom Ad

JPN NEWS