मुंबई - शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्यजी ठाकरे यांनी आज मातोश्री येथे पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आदित्य ठाकरे यांनी धारावी संदर्भातील सरकारच्या भ्रष्ट धोरणाबाबत टीका केली. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की 'मुलुंड मध्ये PAP प्रकल्प अजून सरकारने रद्द केलेला नाही. फक्त मिहीर कोटेचा म्हणतात तो प्रकल्प रद्द होणार आहे . पण धारावी प्रोजेक्ट मधे ७०% जमीन BMCची आहे. त्यामुळे प्रीमियम मिळताना ५ हजार कोटी मुंबई महापालिकेला मिळायला हवेत .. त्याचबरोबर १ ते २ हजार कोटी म्हाडाला मिळायला हवे होते. मात्र हे पैसे अदानी स्वतःला घेणार आहेत. ते पैसे BMC, म्हाडाला मिळणार नाहीत. असं सरकारचं भ्रष्ट धोरण आदित्य ठाकरे यांनी जनतेसमोर आणलं.
वीस दिवसात MMRDAने १५ हजार कोटी रुपयांचा टेंडर काढल. ४० हजार कोटीची थकबाकी कॉन्ट्रॅक्टरची आहे. आता हे कॉन्ट्रॅक्टर आंदोलन करणार आहेत. धारावीतील प्रकल्पातील लँड प्रीमियम मुंबई पालिका आयुक्तांनी का घेतला नाही ? हा जनतेचा पैसा आहे, आणि याच करणासाठी तुम्ही मुंबई महापालिका निवडणुक तुम्ही घेतली नाही का ? १ आठवडा झाला आयुक्ताना पत्र दिलं आहे , पण अजूनही उत्तर दिलेल नाही. अदानीच्या घश्यात धारावी घालायचं काम सरकार कडून सुरु आहे. मिंदे सरकार कडून लूट सुरु आहे. मिंदेच नगरविकास खाते आणि BMC लूट करत आहे असं म्हणत पालिका आयुक्तांच्या बेजबाबदार आणि निष्क्रिय वर्तणुकीवर बोट ठेवतानाच सरकारचाही समाचार आदित्य ठाकरे यांनी घेतला.
वांद्रे पूर्वेतल्या शासकीय वसाहतीच्या रहिवाश्यांना मालकी हक्काची घरं -
वांद्रे पूर्व येथील शासकीय वसाहतीमधील रहिवाशी गेल्या ४ दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत . या उपोषणस्थळी आदित्य ठाकरे यांनी आज भेट दिली . ग. क्वा. रे. असोसिएशनतर्फे रहिवाशांचे गेले चार दिवस मालकी हक्कासाठीचे घर, भूखंड मिळण्याकरिता आमरण उपोषण सुरू आहे . महाविकास आघाडी सरकार काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्यांनी वाद्रे असोसिएशनसाठी भूखंड मंजूर केला होता. मात्र सरकार बदलताच इतर प्रकल्पांप्रमाणेच या प्रकल्पाची कार्यवाही रखडली . त्यामुळे आपलं सरकार आल्यावर पाठपुरावा करून नक्कीच न्याय मिळवून देऊ, असा विश्वास उपोषणकर्त्यांना आदित्य ठाकरे यांनी दिला.
No comments:
Post a Comment