मुंबई - राज्यात नुकत्याच जाहीर झालेल्या २०२४ च्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार दिवंगत आमदार टी एम कांबळे यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटीक) पक्ष २८८ विधानसभा मतदारसंघापैकी मुंबई, विदर्भ व मराठवाडयातील दहा जागा लढवणार असल्याची घोषणा पक्षाच्या विद्यमान राष्ट्रीय अध्यक्षा नंदाताई टी. कांबळे यांच्या आदेशाने पक्षाचे युवक राष्ट्रीय अध्यक्ष कनिष्क कांबळे यांनी केली.
आरपी आय डेमो क्रेटीक पक्षाची मुंबई, विदर्भ व मराठवाडयात बऱ्यापैकी ताकद असून मुंबईतील १७८- धारावी, विधानसभा मतदारसंघ, विदर्भातील २४ सिंदखेड राजा, ५१- उमरेड तर मराठवाडयातील -१०८ औरंगाबाद पश्चिम, १०९ औरंगाबाद पूर्व, १०२- बदनापूर ९०- देगलूर, ९१- मुखेड, २३४- लातूर ग्रामीण, २३७ उदगीर या विधानसभा मतदारसंघात पक्षाचे उमेदवार उभे करून लवकरच उमेदवारांची, उमेदवारांच्या नावासह यादी जाहीर करण्यात येईल अशी माहिती कनिष्क टी कांबळे यांनी दिली.
No comments:
Post a Comment