निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तात वाढ, ठिकठिकाणी तपासणी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 October 2024

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तात वाढ, ठिकठिकाणी तपासणी


मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये बंदोबस्त वाढविण्‍यात आला असून स्थिर व फिरत्या पथकांकडून मोठ्याप्रमाणात ठिकठिकाणी तपासणी सुरू आहे. तपासणी प्रक्रियेत प्रत्येकाने सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

आदर्श आचारसंहितेची 28 पथके स्थापन करण्यात आली आहेत. 211-भरारी पथके, 226- स्थिर पाहणी पथके, 172- व्हिडिओ निगराणी पथके,65- व्हिडिओ पाहणी पथके स्थापन करण्यात आली आहेत. 105- तपासणी नाके आहेत.

तपासणी प्रक्रियेत सहकार्य करण्याचे आवाहन - 
निवडणूक काळात नागरिकांनी व्यापाऱ्यांनी, व्यावसायिकांनी कोणतेही साहित्य, रकमा सोबत ठेवतांना त्‍यासंदर्भाचे योग्य दस्‍तऐवज सोबत ठेवावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये कडेकोट बंदोबस्त करण्यात आला असून दाखल झालेले निवडणूक निरीक्षक तपासणी संदर्भात जागरूक असून जिल्ह्यातील जप्ती प्रकरणातील आढावा घेण्यात येत आहे.

विविध यंत्रणांकडून तपासणी -
विधानसभा निवडणुकीदरम्यान कोणत्याही परिस्थितीत पैशांचा गैरवापर, मद्याचा मोफत पुरवठा, भेटवस्तूंचे वाटप, किंवा कोणतेही आमिष दिले जाऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनासह इन्कमटॅक्स, राज्य उत्पादन शुल्क, केंद्रीय वस्तू आणि सेवा कर, राज्य वस्तू आणि सेवा कर, व्यावसायिक कर, अमली पदार्थ नियंत्रण दल, सीमा सुरक्षा दल, सशस्त्र सीमा दल, पोलीस दल केंद्रीय, औद्योगिक सुरक्षा दल, भारतीय किनारा दल, रेल्वे संरक्षण दल, पोस्ट विभाग, वन विभाग, नागरी उड्डयन विभाग, विमानतळ प्राधिकरण, राज्य नागरी विमान वाहतूक विभाग, राज्य परिवहन विभाग, यांच्यासह  फिरते पथक (एफएसटी) स्टॅटिक सर्विलन्स टीम (एसएसटी) कार्यरत आहेत.

निवडणूक काळात वाहनांची कसून तपासणी होत असून दररोज हा अहवाल निवडणूक विभागाला सादर केला जात असल्याची माहिती निवडणूक प्रशासनाने दिली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad