भाजपच्या मुरजी पटेल यांची उमेदवारी अडचणीत - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 October 2024

भाजपच्या मुरजी पटेल यांची उमेदवारी अडचणीत


मुंबई - राज्यात विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच नेत्यांकडून बैठकांचा धडाका सुरु आहे. काही नेत्यांना तिकीट वाटप चर्चा सुरू आहे. अंधेरी पूर्व येथील भाजप नेते मुरजी पटेल यांच्या अडचणी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी भाजप आणि शिवसेना शिंदे गटांमध्ये रस्सीखेच सुरू असताना भाजपाचे मुरजी पटेल हे निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक आहेत. या संदर्भात मुरजी पटेल हे देवेंद्र फडणवीस यांचा भेटीसाठी सागर बंगल्यावर गेले होते. पण आता मुरजी पटेल यांच्या उमेदवारीत अडचण येण्याची शक्यता आहे.

हे प्रकरण असं आहे की गेल्या पाच ते सहा दशकांपासून अंधेरी पूर्व येथील एमआयडीसीच्या मरोळ औद्योगिक क्षेत्रात अनेक झोपडपट्टी धारक वास्तवास आहेत ही जागा एमआयडीसीच्या मालकीची आहे. एमआयडीसी मार्फत विकासक म्हणून आकृती निर्माण लिमिटेड म्हणजेच आत्ताची हबटाऊन या कंपनीची नेमणूक करण्यात आली आहे. २८ वर्षे झाले तरी शेकडो कुटुंबीय हक्काच्या घरापासून वंचित आहे विकासक कंपनीचे प्रतिनिधी मुरजी पटेल यांनी रहिवाशांना नकली ताबा पत्र आणि नकली आश्वासन दिले असा आरोप एमआयडीसी घर हक्क संघर्ष समितीचे संयोजक प्रकाश खंडागळे यांनी केला. या प्रकरणी रहिवाशांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

या आधी देखील मुरजी पटेल यांनी २०१७ मध्ये पालिका निवडणुकीत खोट जातप्रमाणपत्र दाखल केल्याबाबत पटेल यांच्यावर गुन्हा दाखल आहे. निवडणूकाच्या तोंडावर मुरजी पटेल यांना पुन्हा एकदा उच्च न्यायालयात हजर राहावे लागेल. 

ही लढाई खूप दिवसांपासून सुरू होती, अनेक तक्रारी करून सुद्धा पोलीसांनी यांवर लक्ष दिले नाही. आणि याचा त्रास तेथील नागरिकांना सहन करावा लागत आहे.  काही लोक कंटाळून सोडून गेली आहे. रहिवाशांची फसवणूक झाली आहे.
- मंगेश देशमुख (वकील)

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad