मुंबई - एसटी कर्मचाऱ्याना दिवाळी भेट रक्कम मिळणार की नाही अशी चिंता वाटत असतानाच आता आचार संहितेचे कारण देत वेतनही दिवाळीपूर्वी देण्यास टाळाटाळ केली जात असून महिनाभर काम केल्यावर वेतन मिळते त्याचा आचार संहितेशी संबंध काय? असा सवाल महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी प्रशासनाला केला आहे.
दिवाळी सण तोंडावर आल्याने राज्य भरातील सर्वच शासकीय कर्मचारी व अधिकारी यांना दिवाळी सण आनंदात साजरा करण्यात यावा यासाठी दिवाळी पूर्वी वेतन देण्याच्या सूचना राज्य शासनाकडून प्रसारित करण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी वेतनही देण्यात आले आहे. त्याच धर्तीवर एसटी कर्मचारी व अधिकारी यांना दिवाळी पूर्वी वेतन मिळावे यासाठी सरकार कडून ३५० कोटी रुपयांची सवलत मूल्य परतावा रक्कम देण्यात आली आहे. असे असताना वेतन देण्यात टाळाटाळ केली जात असून आचार संहितेची भीती वाटत असल्याने वेतन उशिरा दिले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आचार संहिता नाही.व एसटी कर्मचाऱ्यांना आहे हे दुटप्पी धोरण असून "भित्या मागे ब्रम्ह राक्षस "अशी प्रशासनाची अवस्था झाली आहे.असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही. असा टोलाही बरगे यांनी लगावला आहे.
एकीकडे एसटी कर्मचारी व अधिकाऱ्याना दिवाळी भेट रक्कम मिळण्याची शक्यता धूसर झाली असतानाच आता वेतनही दिवाळीपूर्वी मिळणार की नाही अशी शंका निर्माण झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली असून महिनाभर काम केल्यावर वेतन मिळते त्याचा व आचार संहितेचा संबंध नसून प्रशासनाने तात्काळ कर्मचारी व अधिकाऱ्याना वेतन द्यावे अशी मागणीही बरगे यांनी केली आहे.
ليست هناك تعليقات:
إرسال تعليق