मुंबई - सध्या दिवाळी निमित्त रेल्वेने गावाला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशातच बांद्रा रेल्वे स्थानकात आज पहाटे चेंगराचेंगरीची घटना घडली. या घटनेत 9 प्रवासी जखमी झाले आहेत. (Stampede)(Stampede at Bandra station)
मिळालेल्या माहितीनुसार, बांद्रा टर्मिनस येथून गोरखपुरला जाणारी (Train No. 22921, Bandra-Gorakhpur Express) एक्सप्रेस मध्यरात्री 2.55 वाजता सुटणार होती. या गाडीने प्रवास करण्यासाठी स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे प्रवाशांची चेंगराचेंगरी झाली. जखमी 9 प्रवाशांना जवळच्या भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी 7 प्रवशांची प्रकृती ठीक असून 2 प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे. सर्व जखमी प्रवाशांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Name of Injuries -
1. Shabhir Abdul Rehman M/40, admitted condition stable.
2. Parmeshwar Sukhdar Gupta M/28, admitted condition stable.
3. Ravindra Harihar Chuma M/30, admitted condition stable.
4. Ramsevak Ravindra Prasad Prajapati M/29, admitted condition stable.
5. Sanjay Tilakram Kangay M/27, admitted condition stable.
6. Divyanshu Yogendra Yadav M/18 admitted condition stable
7. Mohammad Shareef Shaikh M/25, admitted condition stable.
8. Indrajith Sahani M/19, admitted admitted condition critical.
9. Noor Mohammad Shaikh M/18, admitted condition critical.
No comments:
Post a Comment