मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या आदेशानुसार 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना तसेच लाभार्थी भगिनी कुटुंब भेट हा कार्यक्रम राज्यात सुरू झाला आहे. गुरुवारी कुटुंब भेट संदर्भात विधानसभा निहाय बैठकीचे आयोजन मुगभाट क्रॉस लेन आणि कामाठीपुरा येथे करण्यात आले होते. यावेळी, ॲड. सुशीबेन शाह यांनी सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
राज्यभर 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट' कार्यक्रम राबविण्याकरता शिवसेना विभागनिहाय समन्वयकांची नावे जाहीर झाली असून शिवसेना प्रवक्त्या ॲड. सुशीबेन शाह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शाह यांच्याकडे मुंबई आणि ठाणे या विभागाची जबाबदारी पक्षाने सोपवली आहे. यावेळी, शाह यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी, कुलाबा विधानसभा मतदार संघ, मलबार हिल विधानसभा मतदार संघ आणि मुंबादेवी विधानसभा मतदार संघातील शाखा प्रमुख व पदाधिकारी उपस्थित होते.
ॲड. सुशीबेन शाह यांनी सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः लाभार्थी भगिनिंच्या घरी जाऊन भेट घेतली आणि संवाद साधला. त्यामुळे आता सच्चा शिवसैनिक म्हणुन कुटुंब भेट ही मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण करायची संधी मिळाली आहे. लाभार्थी महिलांच्या घरी जाऊन योजनेचे पैसे मिळाले का? पैसे का मिळाले नाही. कुठे समस्या येत आहे? हे सर्व तसापून महिलांना मार्गदर्शन करणे. प्रत्येक घराघरांमध्ये जाऊन नागरिकांची भेट घेऊन सरकारी योजनांची माहिती देणे. आणि प्रत्येक महिलेला योजनेचा लाभ करून द्यायचा आहे, ही सर्व शिवसैनिकांची जबाबदारी आहे.
सरकारी योजनेमध्ये जास्तीत जास्त महिला कशा सामील होतील, याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. कुटुंब भेट ही सरकारी संकल्पना आहे. लवकर एक ॲप लॉन्च करून त्यात कुटुंब भेट कार्यक्रमाची माहिती दिली जाणार आहे. एक किंवा दोन पदाधिकाऱ्यांनी दिवसाला १५ कुटुंबाला भेट देणे अनिवार्य आहे. त्यासोबत एक फॉर्म दिला जाईल तो लाभार्थ्यांकडून भरून घ्यायचा आहे. त्यानंतर कुटुंबासोबत फोटो घ्यायचा आहे, असे मार्गदर्शन
ॲड. सुशीबेन शाह यांनी पदाधिकाऱ्यांना केले. यावेळी, विभाग प्रमुख दिलीप नाईक, विभाग संघटक विजय वाडकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment