१९ सप्टेंबरला अंधेरी पूर्व, पश्चिमेला पाणीपुरवठा बंद - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 September 2024

१९ सप्टेंबरला अंधेरी पूर्व, पश्चिमेला पाणीपुरवठा बंद


मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या के पूर्व विभागातील वेरावली जलाशय-२ येथे ७५० मिलीमीटर व्यासाच्या पार्ले वेसावे (वर्सोवा) निगमवाहिनीवरील (आऊटलेट) चार झडपा (वॉल्व्ह) बदलण्यात येणार आहेत. गुरुवार, दिनांक १९ सप्टेंबर २०२४ रोजी रात्री ८ वाजेपासून दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवार, दिनांक २० सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी २ वाजेदरम्यान हे काम केले जाणार आहे. त्यामुळे, या कालावधीदरम्यान के पूर्व आणि के पश्चिम विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

या विभागात पाणीपुरवठा बंद राहणार - 
के पूर्व - महाकाली मार्ग, पूनम नगर, गोनी नगर, तक्षशिला मार्ग, एमएमआरडीए वसाहत, दुर्गा नगर, पेपर बॉक्स, मालपा डोंगरी क्रमांक ३, शेर ए पंजाब, बिंद्रा संकूल, हंजर नगर, गणेश नगर, शोभना परिसर (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ – पहाटे ४.३० ते सकाळी ७.५० वा.) पाणीपुरवठा बंद राहील.

के पूर्व - सुंदर नगर, गौतम नगर, मॉडर्न बेकरी, प्रजापूरपाडा (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ - पहाटे ५.०० ते सकाळी ८.०० वा.) पाणीपुरवठा बंद राहील.

के पूर्व - त्रिपाठी नगर, मुन्शी कॉलनी, बस्तीवाला कंपाऊंड, अचानक कॉलनी, कलेक्टर कंपाऊंड, सारीपूत नगर (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ - सकाळी ८.०० ते सकाळी १०.०० वा.) पाणीपुरवठा बंद राहील.

के पूर्व – दुर्गानगर, मातोश्री क्लब (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ - सकाळी १०.०० ते दुपारी १२.०० वा.) पाणीपुरवठा बंद राहील.

के पश्चिम- सी.डी. बर्फीवाला मार्ग, उपाश्रय गल्ली, स्वामी विवेकानंद मार्ग अंधेरी, दाऊद बाग, केव्हणी पाडा, धाकुशेठ पाडा, मालकम बाग, अंधेरी मार्केट, भर्डावाडी, नवरंग सिनेमाच्या मागे, अंधेरी गावठाण, आंब्रे गार्डन पंप व गझदर पंप, गिल्बर्ट हिलचा काही भाग, तीन नळ, गावदेवी डोंगरी मार्ग, उस्मानिया डेअरीचा काही भाग (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ - सकाळी ७.३० ते दुपारी १२.०० वा.) पाणीपुरवठा बंद राहील.

संबंधित परिसरातील नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करावा. पाणी जपून आणि काटकसरीने वापरावे. आऊटलेट दुरुस्ती कामानंतर नियमित वेळेनुसार पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येईल. तसेच, पाणीपुरवठा सुरळीत झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून ४ ते ५ दिवस पाणी गाळून आणि उकळून वापरावे, असे महानगरपालिका प्रशासनातर्फे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad