गृहमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाची नासधूस - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 September 2024

गृहमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाची नासधूस


मुंबई - राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाची नासधूस केल्याचा प्रकार समोर आला आहे. मंत्रालयात मुख्यमंत्री, मंत्री, महत्त्वाचे अधिकारी, नेते यांचा कायम राबता असतो. त्यामुळे मंत्रालयात कडेकोट बंदोबस्तही असतो. पण  उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाचीच नासधूस करण्यात आल्याने मंत्रायलातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. (Maratahi News)(Latest News)

मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर  गृहमंत्री फडणवीस  यांचं कार्यालय आहे. गुरूवारी सायंकाळी मुसळधार पावसामुळे  मंत्रालयात फारशी गर्दीही नव्हती. तसेच, कर्मचारीही नव्हते. कर्मचारी वर्गाची उपस्थितीही फारशी नव्हती. पावसामुळे कर्मचारी आणि अधिकारी घर पोहचायचे म्हणून निघून गेले होते. सहा साडेसहाच्या दरम्यान एक महिला थेट फडणवीसंच्या कार्यालयात घुसली आणि आराडाओरडा करायला सुरूवात केली.

कर्मचाऱ्यांनी तिला अडवण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत तिने झाडांच्या कुंड्या फेकून दिले्या होत्या. दालनाबाहेर लावलेली फडणवीसांच्या नावाची पाटीही काढून त्यांनी फेकून दिली. पण पोलीस येईपर्यंत त्या महिलेने मंत्रालयातून पळूनही गेली. पण रात्री उशिरापर्यंत  ही महिला कोण होती हे समजू शकले नाही. मंभालयातील सुरक्षा विभागाकडून संबंधित महिलेचा शोध घेणे सुरू आहे. 

पण या घटनेमुळे मंत्रालयातील सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत. धक्कादायक म्हणजे थेट फडणवीसांच्या कार्यालयाचीच नासधूस होत असताना पोलीस कुठे होते. महिला कोणत्या कामासाठी मंत्रालयात आली होती. तिला पास कोणी दिली. फडणवीसांच्या कार्यालयाची नासधूस करण्यासाठीच आली होती की इतर कामासाठी, नासधूस कऱण्यामागचा हेतू काय आणि एवढ सगळं करूनही ती पसार कशी झाली, सुरक्षा यंत्रणेचे लक्ष नव्हते का, असे अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad