मुंबई - काँग्रेसने आपला नारा “हाथ बदलेगा हालात” वरून “काँग्रेस का हाथ, भाजपा के साथ” असा केला पाहिजे असा टोला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला लगावला आहे.
ॲड. आंबेडकर यांनी म्हटले आहे की, तेलंगणातील काँग्रेस सरकार भाजपच्या पावलावर पाऊल ठेवून भाजपप्रमाणेच काँग्रेसही बुलडोझरचे राजकारण करत लोकांची घरे हिसकावून घेत आहेत. हिमाचल प्रदेशच्या काँग्रेस सरकारने हिंदुत्व आणि द्वेषाच्या राजकारणात भाजपला मागे सोडले आहे. आधी हिंदू-मुस्लिम आग पेटू दिली आणि नंतर योगी आदित्यनाथ यांचे द्वेषाचे धोरण राबवले गेले. वंचित बहुजन आघाडीने आधीच इशारा दिला होता – भाजप आणि काँग्रेस दोन्ही एकच आहेत. एक सापनाथ तर एक नागनाथ आहे.
दलित, आदिवासी, ओबीसी, मुस्लिम यांना भाजप आणि काँग्रेसच्या तावडीतून बाहेर पडावे लागेल. दलित, आदिवासी, ओबीसी, मुस्लिम यांना एकत्र यावे लागेल. तरच बदल घडेल. तरच सत्ता आपली असेल. असे म्हणत, भाजप आणि काँग्रेसच्या भूलभुलैया भुलू नका असे आवाहनही आंबेडकरांनी मतदारांना केले आहे.
No comments:
Post a Comment