मुंबईला उद्यापर्यंत पावसाचा रेड अलर्ट, शाळा, महाविद्यालयांना सुट्टी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 September 2024

मुंबईला उद्यापर्यंत पावसाचा रेड अलर्ट, शाळा, महाविद्यालयांना सुट्टी


मुंबई - पुढील चार दिवस महाराष्ट्रात ठिकठिकाणी वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईत आज जोरदार पावसाने हजेरी लावली. हवामान विभागाने उद्या (२६ सप्टेंबर) सकाळपर्यंत पावसाचा रेड अलर्ट (Red Alert) देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईतील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. (Mumbai Rain)(Mumbai News) गरज असेल तरच घराबाहेर पडा असे आवाहन करण्यात आले आहे. 

मुंबईत आज सकाळपासून मुंबईत पावसाने जोरदार बॅटींग सुरु केली आहे. मुंबईच्या शहर आणि उपनगरात जोरदार रात्रीपर्यंत जोरदार पावसाने हजेरी लावली. पावसाचा जोर कायम असल्याने मुंबईच्या सकल भागात पाणी साचले. पाणी साचल्यामुळे रस्ते वाहतूक संथ गतीने सुरू आहे. मध्य आणि हार्बर रेल्वे रुळावर पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली. विशेष म्हणजे मुंबईकर कामावरून घरी परतत असताना रेल्वे सेवा बंद पडल्याने प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. अनेक प्रवासी रेल्वेमध्ये अडकून पडले होते. मुंबईमधील सखल भागात पाणी साचल्याने अनेकांच्या घरात पाणी शिरले. काही ठिकाणी गुडघाभर पाण्यातून नागरिकांना वाट काढत घर गाठावे लागले. 

पालिका आयुक्तांकडून आढावा -
दरम्यान मुंबईमधील पावसाचा आढावा पालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर ) डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांनी आपत्कालीन व्यवस्थापन विभाग कार्यालयातून घेतला. पाणी साचलेल्या ठिकाणच्या पाण्याचा निचरा करण्याचे तसेच रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या कामाच्या ठिकाणी दक्ष राहण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. 

शाळा, महाविद्यालयांना सुट्टी -
भारतीय हवामान विभागाने मुंबई महानगराला उद्या (दिनांक २६ सप्टेंबर २०२४) सकाळी ८.३० पर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) दिला आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालयांना उद्या गुरूवार दिनांक २६ सप्टेंबर २०२४ रोजी सुटी जाहीर करण्यात येत आहे आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad