मुंबईच्या चौपाट्या, नैसर्गिक तलाव आणि कृत्रिम तलाव या ठिकाणी विसर्जनाला आज सकाळपासून सुरूवात झाली. त्यामुळे चौपाट्या आणि सार्वजनिक तलाव भाविकांनी फुलून गेले होते. रात्री ९ वाजेपर्यंत एकूण ३८ हजार ९५ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्यामध्ये १९५ सार्वजनिक, ३७ हजार ८९
७९ घरगुती तर २० हरतालिकांचे विसर्जन करण्यात आले.
विसर्जित करण्यात आलेल्या एकूण ३८ हजार ९५ मूर्तींपैकी कृत्रिम तलावात १८ हजार ६९६ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. कृत्रिम तलावात १४३ सार्वजनिक, १८ हजार ५३७ घरगुती तर १६ हरतालिकांचे विसर्जन करण्यात आले. विसर्जनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडली नसल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
No comments:
Post a Comment