मुंबई - पैगंबर हजरत मोहम्मद यांचा जन्मदिन 'ईद मिलाद उन - नबी निमित्तची शासकीय सुट्टी यंदाच्या वर्षी बुधवार, १८ सप्टेंबर रोजी जाहीर करावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे 'भिवंडी पूर्व'चे आमदार रईस शेख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात आमदार शेख यांनी मुख्यमंत्री यांना पत्र लिहिले आहे.
यासंदर्भात आमदार रईस शेख म्हणाले की, पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जन्मदिनी 'ईद मिलाद उन -नबी' निमित्त मुस्लिम बांधव राज्यात जुलूस काढून मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करत असतात. सोमवारी, १६ सप्टेंबर रोजी यंदा ' ईद मिलाद उन- नबी आहे. त्या दिवशी शासनाने शासकीय सुट्टी जाहीर केलेली आहे.
१६ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जनाच्या राज्यात मिरवणुका आहेत. राज्यात सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी मुस्लिम धर्मगुरू, लोकप्रतिनिधी आणि समाजसेवक यांनी पैगंबर हजरत मोहम्मद जन्मदिन उत्सवाचे जुलूस बुधवारी, १८ सप्टेंबर रोजी काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे १८ सप्टेंबर रोजी शासनाने सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी केली आहे, असे आमदार रईस शेख यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment