अकोला - वंचित बहुजन आघाडीतर्फे बौध्द समाज संवाद दौरा काढण्यात आला आहे. आज अशोक वाटिका अकोला येथून बूद्ध वंदना घेऊन या संवाद दौऱ्याला सुरुवात करण्यात आली. या दौऱ्याकरीता काही पदाधिकारी निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये अशोक सोनोने (भारिप), राजेंद्र पातोडे, अकोला, अमित भुईगळ, औरंगाबाद, यु. जी. बोराळे, नवी मुंबई (बौद्ध महासभा), प्रो. मनोज निकाळजे, मलकापूर (विद्वत सभा) यांचा समावेश आहे.
वंचित बहुजन आघाडी भारतीय ही ख-या अर्थाने शोषित, पीडित, वंचित समूहाच्या उत्थान आणि त्याच्या राजकीय अधिकार मिळवून देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अनुसरून परिवर्तनाचा लढा देत आहे.
या संवैधानिक हक्क आणि अधिकार लढ्यात "बहुजन हिताय, बहुजन सुखाय" हे ब्रीद घेऊन पक्ष वाटचाल करीत आहे. वंचितच्या वतीने संविधान बचाव रॅली, शेतकरी मेळावे, ओबीसी आरक्षण बचाव यात्रा, भटके विमुक्त चेतना रॅली, आणि बौध्द समाज संवाद दौरा काढण्यात आला आहे. या नंतर आदिवासी अधिकार दौरा सुद्धा काढण्यात येणार आहे.
अकोला, अमरावती, वर्धा, चंद्रपुर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, नागपुर, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा या जिल्ह्यांतून पहिला टप्पा जाणार आहे. पहिला टप्पा 29 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबर या कालावधीत असेल.
बौद्ध समाज संवाद दौऱ्याच्या माध्यमातून अनुसुचित जाती, जमाती व इतर आरक्षित घटकांचे आरक्षण आणि अधिकार धोक्यात आणणारे निर्णय सत्ताधारी पक्ष घेत आहेत. त्यामुळे तरुण पिढी तसेच वंचित बहुजन आघाडीचे मूळ मतदार यांच्या सोबत हितगुज करून पक्षाचे वतीने आगामी निवडणुकांबाबत घेण्यात आलेले मुद्दे भारतीय लोकशाही, संविधान आणि आरक्षण तसेच विद्यमान राजकीय सामाजिक परिस्थिती संदर्भात संवाद साधण्यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यांत जाणार आहे.
ओबीसी आरक्षण बचाव यात्रा, बौद्ध समाज संवाद यात्रा आणि त्यांनतर आदिवासी अधिकार दौरा यांच्या मार्फत वंचित बहुजन आघाडी दलित, आदिवासी आणि ओबीसी यांच्यापर्यंत यशस्वीरित्या पोहचत आहे. वंचित बहुजन आघाडीने ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात स्पष्ट भूमिका घेतली आहे, तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदिवासी राजकीय पक्षांसोबत त्यांची आघाडी असणार आहे. भारत आदिवासी पार्टी आणि गोंडवाना गणतंत्र पार्टी या दोन पक्षांसोबत आघाडी केल्याचे वंचितने घोषित केले आहे.
दलित, आदिवासी आणि ओबीसी यांच्या आरक्षणाच्या आणि न्याय अधिकारांच्या प्रश्नांसाठी वंचित बहुजन आघाडीने नेहमीच स्पष्ट भूमिका घेतली आहे. तसेच त्यासाठी त्यांनी विविध संवाद दौरे आणि संवाद यात्रेचे नियोजन केले होते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत दलित, आदिवासी आणि ओबीसी यांची साथ मिळून राजकीय परिवर्तन घडणार का, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
No comments:
Post a Comment